महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा चिमूर तर्फे गोविंद लांजेवार यांचा सत्कार सोहळा संपन्न

शहर - प्रतिनिधी ( चंदु मडकवार )

चिमूर : - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा चिमूर येथे कार्यरत असलेले गोविंद लांजेवार यांनी तब्बल २ वर्षे ७ महिण्याचा कार्यकाळ पूर्ण केले असून त्यांचे वरिष्ठ तंत्रज्ञ पदावरुन चिमूर तालुक्यातील नेरी येथील विद्युत वितरण शाखेत प्रधान तंत्रज्ञ या पदावर नियुक्ती करण्यात आली असून चिमूर वितरण कंपनी शाखा चिमूर कडून सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
या वेळी कार्यक्रमाला  अध्यक्ष म्हणून उपकार्यकारी अभियंता संजय जळगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक अभियंता सुमित दडमल, लांजे साहेब, खोब्रागडे साहेब, निखारे साहेब तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचारी आणि कंत्राटदार मजुर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!