पारंपरिक पद्धतीने लग्न मंडप पूजन परंपरा जपून ठेवली ग्रामीण भागांनी

शहरांमध्ये लुप्त

तालूका - जगदीश पेंदाम

वरोरा : - ग्रामीण भागात आजही शेतीचे कामे निघाले नंतर उन्हाळ्याच्या दिवसात लग्न समारंभास सुरुवात होते. मंडपाचे लग्न समारंभाचे परंपरा आजही ग्रामीण भागांनी कायम ठेवलेली आहे. विवाह मंडप टाकण्याची ग्रामीण भागात नऊ डेरी,टाकून त्याच्यावर जंगलामधून बैलगाडी वर जांभूळ ,आंबा, पळस, यांच्या फांद्या बैलगाडीवर आणल्या जाते ही वधू किंवा वरांच्या घराकडे आणत असताना बैलगाडी वर  आंब्यांचा पानांचे तोरण बांधून सजवल्या जाते तसेच बैलांचा पायात, गळ्यात घुंगरू, अंगावर चवर,गळ्यात माळ बांधून सजवल्या जात असून लग्नाच्या घरून दिलेला पोळी, गुळ बैलांना अगोदर खावु घालतात त्या नंतर लग्नाच्या डारा (जांबा) आणल्या करीता गेलेल्या गावातील नागरिक त्या नंतर गूळ पोळीचा आस्वाद घेत असतात.तसेच लग्नकार्याच्या वेळी पूजा करण्याकरीता मुंडाची आणने आवश्यक असते ते सुद्धा सोबत आनण्याकरीता त्याची सुद्धा पूजा करून त्याला तोडले जाते. मुंडा म्हणजे मोवयी झाडाचा फांदा, तसेच उमर झाडाचा फांदा तोडल्या जाते, मुंडा बांधून नेत असताना नवीन कपड्याचा वापर केला जातो.गावात आल्यानंतर गावातील वाद्य आणले जाते त्यावेळी वाजत गाजत जिथे लग्न असेल वधूच्या, वराचा घरी बैलगाडी आणन असतात घरातील एक महिला व्यक्ती त्या बैलगाडीची पूजा करून सोबत असलेल्या सर्व व्यक्तींचे पाय धुवून अकक्षीदांचा टीका लावला जातो, त्यानंतर घरासमोर असलेल्या 9 डेरी च्या मांडवावर   बैलगाडीत आणलेल्या सर्व डारा टाकून मांडव सजावट केली जातो, यालाच जांबा आणणे असे म्हणतात, त्यानंतर  त्याच ठिकाणी  जेवणाची व्यवस्था केली जाते.नंतर सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडले जातात.ग्रामीण भागात मिळत असलेले साहित्य शहरात मिळत नसल्यामुळे ही परंपरा लुप्त होत आहे, ग्रामीण भागात ही परंपरा काही ठिकाणी जपली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!