मुलमध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमणावर बुलडोझर; काँग्रेस नेते संतोष रावत अडचणीत



मुल शहरातील गांधी चौक परिसरात उभ्या राहिलेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष रावत यांनी केलेले कथित बेकायदेशीर अतिक्रमण जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई करत पाडून टाकले. ही कारवाई प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
या घटनेमुळे मुल शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आमदारकीची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या संतोष रावत यांच्यावर शासकीय जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असून, या कारवाईमुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या अतिक्रमणाबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले आणि नगरसेविका प्राची आक्केवार यांनी जिल्हा परिषदेकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अतिक्रमण असल्याचे निष्पन्न केले.
प्रशासनाने कोणताही दबाव न मानता, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई पार पाडली. विशेष म्हणजे, करोडो रुपयांच्या किमतीच्या मध्यवर्ती जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला असला, तरी शासकीय जमिनींचे संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत प्रशासनाने घेतलेली ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!