पवनी तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर;भारती गिरडकर यांची अध्यक्षपदी निवड

शैक्षणिक ठरावांना मंजुरी; सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१६/०४/२०२६ पवनी तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली.या सभेत आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी (२०२६-२०३१) नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून,संघाच्या अध्यक्षपदाची धुरा भारती गिरडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि स्वागत समारंभ:
सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शैलेश मयुर होते. प्रमुख अतिथी म्हणून पवनीचे गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक,रेखा भेंडारकर,सुरेश खोब्रागडे,सुजाता गजभिये,संजय गभने आणि अशोक उकरे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच, यावर्षी सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक शैलेश मयुर आणि अशोक उकरे यांचा संघाच्या वतीने विशेष स्वागत करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी:
सभेत सन-२०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वानुमते नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.निवडीचा तपशील खालीलप्रमाणे:
अध्यक्ष:- भारती गिरडकर
 उपाध्यक्ष:- देवचंद सावरबांधे
 सचिव:- उमेश रायपुरकर
 सहसचिव:-  उत्तम मेंढे
 कोषाध्यक्षा:-  सुजाता गजभिये
यासोबतच तालुक्यातील इतर मुख्याध्यापकांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
शैक्षणिक विषयांवर मंथन:
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक योजना, प्रशासकीय कामकाज आणि गुणवत्ता वाढीवर भर देण्याचे आवाहन केले.सभेत तालुक्यातील शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

 "शिक्षणाचे पवित्र कार्य करताना मुख्याध्यापक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.नवीन कार्यकारिणीने एकजुटीने काम करून तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावा." 
संजयकुमार वासनिक, गटशिक्षणाधिकारी पवनी 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश रायपुरकर यांनी केले,तर उपस्थितांचे आभार भीमराव वैद्य यांनी मानले.या सभेला पवनी तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक अशोक गिरी,संदीप मुंडले,ललिता डेकाटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!