सरस्वती प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.१६/०४/२०२६ पवनी येथील सरस्वती प्राथमिक शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सोनू बावनकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व अभिवादन करून झाली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील साखरे,शाळा व्यवस्थापन समिती मा.उपाध्यक्ष दादाजी काटेखाये तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सहारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा' संदेशाचा जागर:
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला.उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. आंबेडकरांच्या "शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा" या मूलमंत्राचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
सहकार्य आणि आभार:
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शिक्षिका ममता मुंडले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता बारसागडे, स्वयंदिप सुखदेवे आणि मनोरमा सयाम यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!