आता जेएसडब्लू कंपनी सावली, मुल तालुक्यात येणार ? एका यादीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा व इतर गावे अधिग्रहणासाठी प्रस्तावित भूमी....

सावली : (विजय कोरेवार) 

सावली व मूल तालुक्यातील जमिनी जेएसडब्लू कंपनीसाठी प्रस्तावित होत असल्याची चर्चा सुरु झाली असून अधिग्रहणचा प्रस्तावच सामाजिक माध्यमावर वायरल होत असल्याने चामोर्शी तालुक्यातील गावाप्रमाणे सावली व मूल परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. 

         जेएसडब्लू स्टील प्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा व परिसरातील १४ गावे प्रस्तावित झाल्याने तेथील शेतकरी अधिग्रहणासाठी विरोध करीत असून आंदोलन करीत आहेत. मात्र यातच दुसऱ्या टप्प्यासाठी चामोर्शी, गडचिरोली तालुक्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल तालुक्यातील जमिनी जेएसडब्लू कंपनीसाठी प्रस्तावित होणार असल्याची यादी सामाजिक माध्यमावर व्हायरल होत आहे. त्यात सावली तालुक्यातील सावली, सावली तुकूम, कवठी, पारडी, रुद्रापूर, सिंगापूर, उसेगाव, सिंदोळा, घोडेवाही, भट्टीजांब, जीबगाव, सिर्सी, सिरसिमाल, साखरी लोंढोली, हरंबा, कढोली, साखरी, उमरी ही गावे तर मूल तालुक्यातील मूल, जुनासुर्ला, चांदापूर, राजगड, भवराळा, बोरचंदली, आकापूर, मरेगाव, चिंचोली, चितेगांव, कोसंबी, फिस्कुटी, चुरूळ तुकूम, नवेगाव भुजला, कोसंबी या वैनगंगा तिरावरील व सुपीक, उत्पादनाच्या जमिनी अधिग्रहण होणार असल्याच्या चर्चेने शेतकरी धास्तावले आहेत. ज्या ठिकाणच्या जमीनी प्रकल्पासाठी अधिग्रहित केले आहे त्या ठिकाणचा अनुभव फार वाईट असल्याने शेतकरी प्रकल्पाला प्रखर विरोध करणार आहेत. 

प्रस्तावाबाबत प्रशासन अनभिज्ञ..

सावली, मुल तालुक्यातील जमीनी कंपनीसाठी अधिग्रहण बाबत शासकीय स्तरावर कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही किंवा शासन स्तरावर कोणताही प्रस्ताव मागविण्यात आलेला नाही.

 श्री. अजय चरडे

उपविभागीय न्यायदंडाधिकारी मुल 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!