फुलांच्या सुगंधांनी सजली जंगल वनराई... इंटरनेटच्या जमान्यात लग्न समारंभाची प्रथाही झाली बंद..

फुलांच्या सुगंधांनी सजली जंगल वनराई...

इंटरनेटच्या जमान्यात लग्न समारंभाची प्रथाही झाली बंद..


वरोरा....जगदीश पेंदाम

माघ, फाल्गुन महिना सुरू झाला असून जंगलीमध्ये  असलेल्या वेगवेगळ्या वृक्षांना फुले लागले असून वनराई सुगंधाने निसर्गाच्या स्वागतासाठी दळवळून ठिकठिकाणी सजलेली आहे...

जंगलातील वेगवेगळ्या झाडांना माघ, फाल्गुन महिन्यात फुले आली असून हिरवीगार जंगल दिसायला लागली आहे यामध्ये  पळस फुल हा सुंदर लाल, तपकिरी चमकदार दिसत असुन ताडोबातील वन्यजीव परिक्षेत्र, वडाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वडाळा पीएफ मध्ये दुर्मिळ असलेला पिवळा पळस हा फुललेला आहे, पिवळा पळस झाडाच्या संगोपनासाठी ताडोबा वनपरिक्षेत्र कार्यालय वडाळा यांनी पावले उचलली असून झाडाचे संगोपन करीण्यासाठी भोवताल वनविभागाकडून निगा राखली जात आहे..

पळस झाडा बरोबर इतर वृक्षांना सुद्धा फुले लागलेली असून जंगलातील वनराईमध्ये चार, कडुनिंब, कुकडी,लोखंडी, यांची फुले बहरली असून या झाडावर निळनिराळे फुलपाखरू,मधमाशा किडे, विविध पक्षांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे,

एकेकाळी पळसाच्या पानाच्या झाडापासून लग्न समारंभामध्ये येणाऱ्या नागरिकांना जेवणाकरीता करीता पात्र, द्रोण बनवल्या जात असायची आता ही प्रथा बंद झालेली असून दुर्मिळ झालेले आहे, याच झाडाचे खोड हे लग्न समारंभ मध्ये वर तसेच वधू करीता बसण्याकरीता पाठी बनवून त्या ठिकाणी लग्न कार्याची वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा कार्य करून घेतली जात असायचे, तसेच त्याच झाडाची साल काढून वधूच्या लग्न समारंभातील मुख्य मांडवात बांधुन ती साल वर हा  वघुच्या मंडपात आल्यानंतर ती एका हाताने काढून मंडपात प्रवेश करून लग्न समारंभाला सुरुवात व्हायची.पळसाचे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान असून फुलांपासून उन्हाळ्यामध्ये लागत असलेल्या उष्माघात याच्या बचाव करीता फुलांचे पाणी तयार करून पिल्या जात होते, व ग्रामीण जनता उष्माघातापासून बचाव करीत असायचे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!