अखेर घोटाळेबाज ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे निलंबित - कोंडेखल ग्रामपंचायतमध्ये आर्थिक घोटाळा करणे भोवले @ भद्रावती नंतर दुसऱ्यांदा निलंबित होण्याचा पराक्रम

सावली -  कोंडेखल ग्रामपंचायतीमध्ये काम न करताच लाखोचा आर्थिक गैरप्रकार केल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार व कामात कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाईची मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी लावून धरली त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने धीरधम्मा रायपुरे यांना निलंबित करण्यात आले. रायपुरे ग्रामसेवक दुसऱ्यांदा निलंबित झाल्याने घोटाळेबाज ग्रामसेवक अशी उपमा ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

        कोंडेखल येथील उपसरपंच नरेश बाबनवाडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बोदलकर, सदस्य रोशन वालदे यांनी ग्रामपंचायत कोंडेखल येथे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून चौकशी झाली. चौकशीत कोंडेखल ग्रामपंचायतीत काम न करताच शासकीय निधीचे लाखो रुपये लंपास केल्याचा व ४ महिन्यापासून मासिक सभा न घेण्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समिती प्रशासनाने केलेल्या चौकशीत ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांचा प्रताप सिद्ध झाला. त्यानंतर प्रकरणाची बातमी "पब्लिक पंचनामा" पोर्टलवरून प्रकाशित करण्यात आली. मात्र ही बातमी जिव्हारी लागल्याने पोर्टल व बातमी वायरल करणाऱ्यांवर ५० लाखाचा मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकीच दिली. त्यामुळे "पब्लिक पंचनामा" पोर्टलवरून कोंडेखल ग्रामपंचायत घोटाळ्याची मालिकाच चालविण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी एका आदेशाद्वारे ग्रामसेवक रायपुरे यांना निलंबित केले आहे.

💰 घोटाळेबाज ग्रामसेवक पूर्वी भद्रावती पंचायत समितीमधून निलंबित..

 ग्रामसेवक रायपुरे यांची घोटाळेबाज अशी ओळख जिल्ह्यात आहे. चंद्रपूर पंचायत समितीतील दाताळा ग्रामपंचायतमध्येही आर्थिक अपहार केल्याची तक्रार करण्यात आली होती. भद्रावती पंचायत समिती अंतर्गत मांगली (रै.) ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांनी आपल्या कार्यकाळात गृहकर, सामान्य पाणी कर, विशेष पाणी कर, पंधरावा वित्त आयोग, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम यातून जमा झालेल्या रकमेतून आर्थिक अपहार करून ३५ लाख ४ हजार ३९२ रुपयांचा अपहार केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात दुसऱ्यांदा निलंबित झाल्याने विभागीय चौकशीत कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

🏠तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावरील कारवाईकडे लक्ष...

कोंडेखल गैरव्यवहारात तत्कालीन ग्रामसेवक आनंद देवगडे व सरपंच सरला कोटगले यांनीही गैरव्यवहार केल्याने यांचेवरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी गावाकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!