वाघाच्या हल्यात मेंढपाळ ठार - मूल तालुक्यातील घटना

मूल - तालुक्यातील फिस्कुटी शेतशिवारात शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढपाळ वासुदेव गणपतजी कंकलवार रा. जुनासुर्ला यास ठार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
मुल तालुक्यातील फिस्कुटी शेतशिवारात महाकाली मंदिराचे परिसरात शेतात शेळ्या मेंढ्याचा कळप मुक्कामी होता. वासुदेव कंकलवार हा भावासोबत कळपाच्या बाजूला झोपला असतांना रात्रौ १२ वाजताच्या दरम्यान वाघाने हल्ला केला. घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता जवळच मृतदेह सापडला. पोलीस विभाग व वनविभाग पथक दाखल होऊन शवविच्छेदनसाठी मूल येथे मृतदेह हलवीला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!