महसूल अभियानाचा लाभ घ्या: तहसीलदार मोरे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाला सुरुवात; मूल तालुक्यात विविध ठिकाणी शिबिरे


मूल : महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत मूल तालुक्यात विविध मंडळांमध्ये समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मृदुला मोरे यांनी दिली आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले जात आहे. या शिबिरांमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
शिबिरांचे नियोजन
या अभियानांतर्गत खालीलप्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत –
७ मार्च २०२६ – बेबाळ मंडळ (विवेकानंद महाविद्यालय, बेबाळ)
१४ मार्च २०२६ – चिखली मंडळ (माणिकादेवी मंदिर मैदान)
१० एप्रिल २०२६ – राजगड मंडळ (से. बापूजी पाटील हायस्कूल मैदान)
१७ एप्रिल २०२६ – चिरोली मंडळ (महात्मा फुले शाळा)
८ मे २०२६ – मूल मंडळ (तहसील कार्यालय)
शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा
या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये –
7/12 उतारा दुरुस्ती व डिजिटल 7/12 वितरण
प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा
जात, उत्पन्न, रहिवासी आदी दाखल्यांचे वितरण
सामाजिक अर्थसहाय्य योजनांची माहिती
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना
शासन जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरण व पट्टे वाटप
शालेय विद्यार्थ्यांना दाखले वितरण
हेल्पडेस्कद्वारे अभिलेख दुरुस्ती मार्गदर्शन
नागरिकांना आवाहन
या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे ५ मार्च २०२६ पर्यंत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. गावागावात दवंडी व लाऊडस्पीकरद्वारे या शिबिराची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!