महिला आर्थिक विकास महामंडळ (म आ वी म) कडून गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय चंद्रपूर संचालित,सावित्री लोकसंचालित साधन केंद्र वरोरा यांच्या संयुक्त विधमाने नवतेजस्वीनी ग्रामीण महिला उधम विकास प्रकल्प अंतर्गत महिला सक्षमीकरण व सामाजिक समानता या करीता गाव स्तरावर सकारात्मक सहभाग नोंदविलेल्या पुरुषाकरीता गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन दिनांक.०५/०२/२०२६ गुरुवरला केले हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप काठोळे,प्रमुख अतिथी पंकज घरत महसूल अधिकारी वरोरा,प्रमुख अतिथी लोकनाथ रामटेके सरपंच गट ग्रामपंचायत सावरी बीड,अनिता पाटील सीएमआरसी अध्यक्षा,वंदना वाढई सीएमआरसी सचिव कार्यक्रमाचे संचालन कु.सीमा धूर्वे यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बानकर यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंजू दुर्गे यांनी केले,कार्यक्रमाला उपस्थित crp वैशाली रामटेके,किरण मेश्राम, अश्विनी मोडक,मीनाक्षी बावणे , प्रियंका फुलकर होते.गौरव पुरस्कार जोगेंद्र पाटील,गौतम पाचभाई, अमोल दातरकर,विजय गाठले यांना प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!