मुल येथे शिवटेकडी वर महाशिवरात्री निमिताने भक्तिमय गाण्यांचा कार्यक्रम तसेच साबुदाणा खिचडी वाटप
शिवटेकडी उत्सव समिती मुल चा उपक्रम
मुल येथील स्वर्गीय जनार्धन मस्के यांना साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारातून त्यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी चंद्रपूर रोड वरील टेकडीवर शिवलिंगाची स्थापना केली, तेव्हापासून त्या टेकडीला मुल वासीय व परिसरातील जनता शिवटेकडी म्हणून ओळखायला लागली, कालांतराने भाविकांनी टेकडीवर तिरूपती बालाजी, गणेशजी, हनुमंत, राधा कृष्ण या देवी देवतांच्या मुर्त्या सुद्धा स्थापन केल्या, वर्षभर भाविक सदर टेकडीवर देवी देवतांची मनोभावे पूजा अर्चना करीत असतात, मागील अनेक वर्षांपासून महाशिवरात्री च्या दिवशी परिसरातील हजारोच्या संख्येने भाविक शिवटेकडी वर दर्शनासाठी येत असतात, जनार्धन मस्के यांच्या दुःखद निधनानंतर शिवटेकडी उत्सव समिती च्या माध्यमातून शिवरात्रीला उत्सव साजरा करीत असते, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपवास साबुदाणा खिचडी चे वाटप राहणार असून सुप्रसिद्ध गायक विकी गायकवाड यांचा संच भक्तीमय गीतांचा नजराना सादर करणार आहेत, सदर संगीताचा कार्यक्रम हा दुपारी11 ते 4 वाजेपर्यंत चालणार असून भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन शिवटेकडी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!