सावित्रीबाई फुले विद्यालयात 'राष्ट्रीय युवा दिन' व 'राजमाता जिजाऊ जयंती'




तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१३/०१/२०२६ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून, तसेच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या संयुक्त कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून केला.यावेळी उपस्थित सर्वांनी या महान विभूतींना विनम्र अभिवादन केले.त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊंच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक,राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, "स्वामी विवेकानंदांची प्रखर बुद्धिमत्ता आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार व धाडस यांचा आदर्श आजच्या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी या थोर व्यक्तींचे विचार आत्मसात करून कार्य करत राहावे."
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका विना जिभकाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अर्चना दडवे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता सामूहिक 'वंदे मातरम्'ने करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुणा कांबळे,सुमय्या शेख तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!