शेगाव ग्रामपंचायत विरुद्ध पोलखोल प्रेस कॉन्फरन्स



वायसीसी ग्रुप ने वाचला ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराचा पाढा...



वरोरा....जगदीश पेंदाम

शेगाव ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या मध्ये 13 सदस्य आहे मागील अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येत असून ग्रामपंचायत समोर वाय.सी.सी. ग्रुप शेगाव बुज तसेच गावकरी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवुन ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य यांच्या पाच वर्षाच्या काळात शेगाव मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे वाचन वाचन करून भ्रष्टाचाराचे आरोप पत्रकार परिषदेत केले आहे..

ज्यामध्ये मुख्य म्हणजे गावासाठी खरेदी केलेल्या डस्टबिन किंमत ५२६३३८ रू ज्या अद्यापही लावण्यात आलेला नाही यामध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच पाणी पुर्वठ्या साठी म्हणून घेण्यात आलेली १०एच.पी. समर्सिबल पंप ३ नग किंमत ९०८४०० रु जी फक्त कागदपत्रे घेण्यात आली प्रत्यक्षात तिचा व्यवहार झालेला नाही अशा प्रकारचे विविध आरोप केलेले आहे. 
वाय. सी. सी. ग्रुप व गावकरी यांनी आरोप करताना माहितीच्या अधिकारात मागितलेले कागदपत्रे दाखवली व यावर चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून संबंधित भ्रष्टाचार झालेल्या रकमेची तफावत सरपंच व इतर सदस्य यांच्याकडून वसूल करण्यात यावी अन्यथा गावकऱ्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेला आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे २ सदस्य माया तडस व प्रफुल वाढई हे सुद्धा उपस्थित होते यांनी सुद्धा ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्य यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. तसेच ५ वर्षामध्ये एकही ग्रामसभा झालेली नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. 

प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस वाय सी सी ग्रुप सदस्य तसेच इंजिनियर नवीस नरड इंजिनिअर त्याचा प्रहार सेवक अक्षय बुंदुलवार तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे अमोल दातारकर गीता फुलकर व युवक,महिला, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!