ग्रापंचायत सचिवावर कठोर कारवाई करा - सरपंच,उपसरपंच सहित ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

गट विकास अधिकारी यांना दिले मागणीचे निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पासून जवळचे असलेल्या भटाळा या ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी हे वारंवार सर्वसाधारण सभा, तहकूब  सर्वसाधारण ग्रामसभा, व मासिक सभा यांना ते स्वतः नोटीस काढून सुद्धा हजर राहत नसल्याकारणाने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सचिव भटाळा कठोर कारवाई करण्याची निवेदन दिलेली आहे.भटाळा ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी हे  स्वतः ग्रामसभेच्या तारखी काढून १२ जानेवारी 26 ला  सर्व साधारन सभा, २२ जानेवारी तहकूब सर्व साधारण सभा त्यांनी स्वतः तारखा  काढून सुद्धा स्वतः ग्रामविकास अधिकारी हे हजर नव्हते ग्रामपंचायत सदस्य हजर राहून गावातील जनता त्रस्त  होऊन निघून गेली. २३ जानेवारी ला ग्राम विकास अधिकारी यांनी मासिक सभा आयोजित केली असता त्याही सभेला ते हजर राहिले नाही तसेच सरपंचाना मनमानी करणे, नागरिकांची कामे न करणे, यामुळे गावाची कामे पर्यायाने विकास खोडमला असून त्रस्त भटाळा गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्याकडे २३ जानेवारी ला लिखित स्वरूपात भटाळा गावाचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!