चार चाकीची दुचाकीला समोरा - समोर धडक
एक जण जागीच ठार
वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग 353 ई वरील घटना
दोन तास दोन्ही मार्गाची वाहतूक ठप्प
पोलीस उपअधिक्षक यांच्या मध्यस्थीने वाहतूक सुरळीत
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हद्दीमध्ये दुपारच्या सुमारास चारचाकी ची दुचाकीला समोरा - समोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग 353 ई वर वहानगाव,खडसंगी च्या मधात घटना घडली.
चिमूर तालुक्यातील भिसी च्या जवळ असलेल्या कन्हाळगाव येथील अभय नन्नावरे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक. MH 34 BM 3208 सासुरवाडी खापरी येथे चिमुर कडून येत असता दुसरे वाहन चंद्रपूर वरून यादव शिवराम श्रीरामे हे आपल्या स्कार्पिओ क्रमांक. MH 34 BB 1225 या वाहनाने चिमूर कडील मानेमोहाडी येथे आपल्या पुतण्याच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी फॅमिली घेऊन जात असताना दुपारच्या सुमारास दुचाकी वाहन विरुद्ध दिशेने येत असताना चारचाकी स्कार्पिओ वाहनाला समोरा - समोर धडक लागून दुचाकी वाहन चालक अभय ननावरे वय 35 वर्षे हा जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती परिसरातील नागरिक तसेच शेगाव पोलीस यांना मिळताच क्षणी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी दोन तास चिमूर,वरोरा राष्ट्रीय महामार्ग 353 ई रोखून धरत, जो पर्यंत मृतकाच्या कुटुंबाला 12 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका ठाम घेतली होती. परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यावेळी रस्ता रोखून धरला असता दोन्ही मार्गाची वाहतूक दोन तास ठप्प पडली होती, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिमूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांनी अधिक पोलीस ताफा बोलवत नातेवाईक, जमावाशी मध्यस्थी करून वाहतूक दोन तासानंतर सुरळीत केली.यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस हे सुद्धा दाखल झाले होते. दोन तासानंतर प्रेत उत्तरणी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या ठिकाणी पाठवण्यात आले असून चारचाकी वाहन चालक यादव व श्रीरामे यांच्या विरुद्ध शेगाव पोलिसांनी कलम 106 (1) 281,125 ब भारतीय न्यायसंहिता व मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे चिमूर यांच्या मार्गदर्शनात शेगाव चे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव तसेच शेगाव पोलीस करीत आहे.
या घटने संदर्भात महामार्ग वाहतूक सहायक पोलिस निरीक्षक माया चाटसे हे उपस्थित असताना त्यांना विचारणा केली असता जर संबंधित दुचाकी वाहन चालकानी हेल्मेट घातले असते तर कदाचित रस्त्यावर पडून सुद्धा त्यांचा जीव वाचला असता तसेच दुचाकी व चारचाकी चालकांनी रस्त्यावरून चालताना वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हाहन यावेळी त्यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!