सावित्रीबाई फुले विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली उपस्थितांची मने; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२६/०१/२०२६
महाराष्ट्र ग्रामीण विकास शिक्षण संस्था खांबाडी/बोरगाव द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचा गौरव आणि राष्ट्रभक्तीचा जागर यावेळी पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष भिमराव वाहने तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये, दिवाकर गोवर्धन,स्वाती नागरीकर, पालक वर्ग लंकेश्वर मु़ंडले यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सामूहिक राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन केले.
विद्यार्थ्यांचे कलाविष्कार आणि मार्गदर्शन: प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले.यात संगीत कवायत, देशभक्तीपर भाषणे,गीते आणि नृत्यांचा समावेश होता.विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान: याच कार्यक्रमाचे औचित्य साधून 'संविधान गुण गौरव' परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले,तर आभार प्रदर्शन संदीप मुंडले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललिता डेकाटे,अरुणा कांबळे,अर्चना दडवे,मानसी ठवकर,विना जिभकाटे,प्रतिभा रामटेके,लिना शेंडे यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!