प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा!



चंद्रपूर:-राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशीच रस्त्यावर कचरा पेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टे होत नाहीत त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी न्यायालयाने शासनाला आदेश दिले आहे. 'प्लास्टिक बंदी' असताना 
त्यानुसारही 'प्लास्टिकच्या  राष्ट्रध्वजाची' विक्री करणे हे कायदा विरोधी आहे.
म्हणून असे राष्ट्रध्वज विक्री करणारे  दुकानदार,समुह यांच्या वर
कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
                   क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये यासाठी लाठ्या खाल्ल्या वेळप्रसंगी प्राणांचेही बलिदान दिले त्यांच्या बलिदानाची ही क्रुर चेष्टाच नव्हे का? राष्ट्रध्वजाचा मान राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
*झेंडा उंचा रहे हमारा* असे आपण अभिमानाने गित गातो. पण त्याच वेळी लहान मुलांच्या हट्टा पोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनावर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर अन नंतर कचरा पेटीत पाहायला मिळतात ते पायदळी तुडवले जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे.यासाठी
दिनांक २३/०१/२०२६
ला चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब श्री सुदर्शन मुमक्का यांना
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!