शेगाव पोलीस स्टेशन मध्ये प्रजासत्ताक दिन सर्व शाळा मिळून उत्साहात साजरा... शाळांचे सांस्कृतीक कार्यक्रमचे आयोजन..


 


 वरोरा....तालुक्यातील शेगाव बु. पोलीस स्टेशन येथे  देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मध्ये गावातील संपूर्ण शाळा, कॉलेज, अंगणवाडी तसेच कॉन्व्हेन्टचे विद्यार्थी यांनी पोलीस स्टेशन मध्ये एकत्र येत राष्ट्रध्वजारोहन करून सलामी दिली. या वेळी शेगाव बु पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
शेगाव मधील सर्व शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन पटांगणात करण्यात आले होते. यावेळी गावातील नेहरू विद्यालय, संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गांधिवार्ड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदिरा नगर, नॅशनल इंग्लिश स्कूल, शेगाव पोलीस स्टेशन कर्मचारी,अंगणवाडी क्र. १ ते ७ या  सगळ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला,यावेळी पोलीस स्टेशन कडून सगळ्या मुलांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!