महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित मंदिर विश्वस्त बैठक संपन्न
चंद्रपूर:-महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित मंदिर विश्वस्त बैठक स्थानीक जलाराम सभागृह येथे
दिनांक ३०/१२/२०२५ ला संपन्न झाली.
मंदिर महासंघाचे ध्येय मंदिर महासंघाद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम जसे प्रत्येक मंदिर मध्ये वस्त्रसंहिता लागु करणे, मंदिरात महाआरती सुरु करणे मंदिराचा परिसर मांस -मद्य मुक्त करणे, मंदिरांची भुमाफीयांनी बळकावलेली जमीन वापस मिळविण्यासाठी प्रयत्न करणे या विषयी श्री गुणवंत चंदनखेडे यांनी
तसेच चंद्रपूर जिल्हा मंदिर संयोजक श्री वासुदेवराव राठोड यांनी माहिती दिली.
मंदिर हे
धर्मशिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे तसेच मंदिर विश्वस्तांचे संघटण होणे
किती आवश्यक आहे या
विषयी चंद्रपूर आध्यात्मिक आघाडी,अध्यक्ष तथा गायत्री मंदिर विश्वस्त
डॉ.शैलेंद्र शुक्ला यांनी मार्गदर्शन करतांना आपले
विचार व्यक्त केले.
तसेच महाराष्ट् मंदिर महासंघाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती
श्री नामदेव उरकुडे यांनी
सांगितली.या बैठकिला
चंद्रपूर येथील २० मंदिर विश्वस्त उपस्थित होते.
*क्षणचित्रे*:-
मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे खुप आवश्यक आहे त्यासाठी मंदिर विश्वस्तांची बैठक लवकरच सुरू करु:-श्री ओम महेश्वरी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!