घोडाझरी पाण्यासाठी उपोषणाचा सहा दिवस सुरु,शेतकरी महिलाही उषोषणात सामील, मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत

घोडाझरी पाण्यासाठी उपोषणाचा सहा दिवस सुरु,शेतकरी महिलाही उषोषणात सामील, मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत

तळोधी (बा.):
       घोडाझरी मध्यम प्रकल्प सन २०२५-२०२६ उन्हाळी हंगाम साठी गोंविदपूर सिंचाई विभाग कार्यालयासमोर शेतकरी यादव रामटेके यांच्या नेतुत्वात सहा दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू असताना मात्र पाटबंधारे‌ विभागाचे अधिकारी मात्र उषोषण करणारे शेतकरी वर्गाशी  बातचित करून तोडगा काढीत नसल्यामुळे आज महीला शेतकरी हे सुध्दा साखळी बेमुदत उपोषणात सहभागी झाल्यामुळे शेतकयाकडून आंदोलन अधिक तिव्र करण्यांचा इशारा देण्यात आलेला आहे. 
         आज बेमुदत साखळी उपोषणाचा सहावा दिवस आहे.१६००० ते २७००० हजार तळोधी मायनर पर्यत पाणी उपलब्ध करुन दया या मागणीवर उपोषण कर्ते ठाम असल्यामुळे सिंचाई विभागाचे अधिकारी वर्ग चिंतेत सापडलेले आहे. साखळी उपोषणात दिवसेंदिवस शेतकरी वर्गाची‌ उपस्थिती वाढत आहे. उपोषणात भारत माता की जय, जय जवान जय किसान, तळोधी वितरिकेला पाणी मिळालाच पाहीजे , मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भुमिका तळोधी, ओवाळा येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. या बेमुदत साखळी उषोषण मंडपात अनेक सामाजीक व राजकीय पुढारी वर्गानी भेट देऊन तळोधी वितरिका धारकांनी केलेली मागणी योग्य असून उषोषणा करणारे शेतकरी वर्गाशी भेटू तोडगा काढण्यांची मागणी सामाजीक संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!