धान उत्पादन शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून सर्रासपणे लूट... बाजार समितीचे दुर्लक्ष..
वरोरा... जगदीश पेंदाम
धान उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात असून, धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्यापारी वर्गाकडून सर्रासपणे लूट सूरु आहे,
सगळीकडे धान उत्पादन झालेले असून शेतकरी वर्गाला आपल्याकडे असलेल्या कृषी केंद्राची कर्ज, बँकेचे कर्ज फेडीसाठी धान विकणे सुरू आहे यासाठी वरोरा तालुक्यासहीत शेगाव, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग धान खरेदी करताना काट्यामधील वजनामध्ये,तसेच पोत्यामागे सर्रासपणे लूट सुरू आहे याकडे बाजार समिती चे दुर्लक्ष झालेले आहे.
अगोदरच वाढता उत्पादन खर्च निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल शेतकरी झालेला आहे
ग्रामीण भागात ठिक ठिकाणी व्यापारी, दलाल धान खरेदी करताना शेतकऱ्याकडे गाडी भाडे,हमाल भाडे प्रति पोता 30 रुपये,एका पोत्यामागील दोन ते तीन किलो वजन काटा कमी करणे हे सुरू असून आर्थिक लूट करून धान उत्पादन शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे, शेगाव परिसरात 20 ते 25 धान खरेदी करणारे व्यापारी वर्ग असून याच्यावर नियंत्रण बाजार समितीचे आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे धान खरेदी करताना कोणताही बाजार समितीच्या कर्मचारी या ठिकाणी खरेदी करताना उपलब्ध राहत नाही, तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात वजन करून संबंधित माल व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये नेल्या जात आहे तो बाजार समितीमध्ये नेल्या जात नसून सहजपणे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, शेतकऱ्यांचा माल घेत असताना बाजार समितीचे नियंत्रण आवश्यक असून या ठिकाणी नियंत्रण बाजारचे समिती दिसून येत नाही,मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पादन खर्च ४० टक्क्यांनी वाढली आहे धान पिकासाठी लागणारी मजुरी, खते, बी-बियाणांचे दर तसेच कीटकनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि तुडतुड्यासारख्या रोगांमुळे धान उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची सरसपणे लूट होत आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे..
शेगाव बाजार समिती येथे व्यापाऱ्याकडून लूट सुरू असून शेतकरी बाजारभावा पासून वंचित राहत असून हमाली दरामध्ये लूट सुरू आहे बाजार समितीचे नियंत्रण नसल्यामुळे अनागोंदी कारभार सुरू असून कर्मचारी हवालदीर असून बाहेरचे व्यापारी कडुन खरेदी सुरू आहे, बाजार समितीच्या शेष सुद्धा कमी झाल्याने बाजार समिती आर्थिक संकटात येणार आहे, बाजार समितीने नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना योग्य भाव, व्यापाऱ्याकडून शेष जमा करण्यास व्यापाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे..
कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा उपसभापती जयंत मोरेश्वर टेंभुर्डे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!