तळोधी येथे भव्य रक्तदान शिबिर.

तळोधी येथे भव्य रक्तदान शिबिर.
(स्वाब फाउंडेशन द्वारे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान.)


तळोधी बा.:

      युवकांमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण होऊन रक्तदानाचे महत्त्व कळण्याकरता व आपल्या परिसरातील आरोग्याच्या समस्या घेऊन गेलेल्या  ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना शहरांमध्ये नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली सारख्या ठिकाणी शहरांमध्ये इकडे तिकडे न भटकता मोफत व वेळेवर रक्त उपलब्ध व्हावा व त्यांना रक्त गोळा करण्याकरिता अडचणी येऊ नये याकरिता 'स्वाब फाउंडेशन' सतत प्रयत्नशील असते. व गावांमध्ये रक्तदान शिबिरे घेऊन रक्त संकलन करून गरजूंना मोफत वर्षभर रक्त पूरवीत असते. तसेच आरोग्य शिबिर आयोजित करून आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटपाचे कार्यक्रम स्वाब संस्था वर्षभर राबवीत असते.  
      याच अनुषंगाने आज नागभीड तालुक्यातील तळोधी बा. येथे साई मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन तळोदी बाळापूरचे प्रसिद्ध डॉक्टर गौरव देशमुख, तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल गुहे, चंद्रकांत लांबट यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस संस्थेचे सदस्य , परिसरातील गावातील ईतर काही युवकांनी तर यावेळी कविता कायरकर व एकाच परिवारातील पांच सदस्यांनी रक्तदान केले, यामध्ये शिबिर मध्ये एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर,.हे आयोजन आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वाब नेचर केअर फाउंडेशन द्वारे करण्यात आले. याकरिता रक्त संकलन करण्याकरिता नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर ही रक्तपेढी आलेली होती. यांनी रक्त संकलन केले 
  या रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करिता स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, शरद गभने, विनोद लेनगुरे, हितेश मुंगमोडे, जिवन गुरनूले,शुभम निकेश्वर, अमीर करकाडे, भोलेनाथ सुरपाम,आदित्य नान्हे, स्वराज मोहुर्ले, गणेश गावतुरे, सुरज नेवारे, गणेश गुरनुले,यांनी परिश्रम घेत हा रक्तदान शिबिर आयोजित केला. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्त दाण्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू म्हणून लेदर ची जिम बॅग, नाश्ता केळी, देण्यात आल्या व या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत जीवन ज्योती ब्लड बँक द्वारे स्वाब संस्थेला स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!