रुद्रापुरात गाडीच्या काचा फुटल्या - नेत्यांच्याच गाडीच्या काचा फुटल्याने तर्क वितर्काला सुरवात



सावली - रुद्रापूर येथे नाटकाचे उदघाटनाकरिता आलेल्या भाजपच्या नेत्यांच्या गाडीचा काचा अज्ञात व्यक्तीने फोडल्याने राजकीय षडयंत्र तर नाही? अशा चर्चाना उधाण आले आहे.
     सावली तालुक्यातील रुद्रापूर येथे बुधवारी "अंधारातील लाल दिवा" या नाटकाचे उदघाट्नप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपचे नेते देविदास बानबले उपस्थित होते. नाटकाचे उदघाटन करून गावाकडे जाण्यासाठी गाडीकडे परत आले असता दोन्ही गाड्यांचे काचा फुटलेल्या स्थितीत होते व गाडीत दगडही आढळले. मात्र गाडी फोडणारे अज्ञात कोण? याचा पत्ता लागलेला नाही. सद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण सर्वदूर आहेत व नेत्यांच्याच गाड्या फोडल्याने राजकीय षडयंत्र तर नसावा? अशा तर्क वितर्क चर्चा रंगत आहे. "अंधारातील लाल दिवा" या नाटकाच्या  नावाचा अर्थ अज्ञात्ताने "अंधारातील फायदा" लावत कृत्य केल्याने नेतेही धास्तावले आहेत व या कृत्याचा निषेधही करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!