वलनी ग्रामपंचायत मध्ये अविश्वास प्रस्तावात सरपंच यांचा विजयी
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - गेल्या काही वर्षापासून राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय ठरलेला होता ग्रामपंचायत सरपंच विरुद्धच्या अविश्वास ठराव सरपंच वलनी वच्छला विकास तिघरे यांनी गावातील जनतेचा विश्वास जिंकून एक मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि विरुद्ध बाजूच्या अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आला पवनी तालुक्यातील वलनी या गावांमध्ये दिनांक.24 डिसेंबर 2025 रोजी अविश्वास ठरावाविरुद्ध झालेल्या निवडणुकीत सरपंच यांनी बहुमताने विजय प्राप्त केलेला असून गावकरी समस्त मोठ्या आनंद उत्साहाने दिसून येत आहेत त्यातच सरपंच यांनी आपले पद पुन्हा राखून ठेवून गावाचा विकास करण्याचे व गावातील समस्या सोडवण्याचे काम पुन्हा आपल्या हातात घेतलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेमध्ये 1031 मतदारांनी आपला हक्क बजावलेला होता मतदानाची सविस्तर आकडेवारी खालील प्रमाणे दिसून येत आहे सरपंच यांना हटवण्यासाठी 272 ठरावाच्या विरुद्ध सौ सरपंच वच्छला विकास तिघरे यांच्या समर्थात 744 अवैध मते 15 तर एकूण मतदान 1031 अविश्वास ठरावाच्या बाजूने 272 मते सरपंच समर्थक 744 मतदातांच्या सहभागाने विजयी तब्बल 472 मताच्या फरकांनी विजयप्राप्त करून अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे निवडणूक गटविकास अधिकारी माने यांच्या उपस्थित ही निवडणूक संपन्न झालेली आहे , संपूर्ण निवडणूक ही शांतपणे पार पाडण्यात आली यामध्ये पोलीस विभाग यांच्या सुद्धा मोठा सहभाग होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!