इंग्रज काळापासून असणाऱ्या पोलीस स्टेशनला असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानापासून वंचित... सन 1938 मध्ये तयार झालं शेगाव पोलीस स्टेशन...

इंग्रज काळापासून असणाऱ्या पोलीस स्टेशनला असणाऱ्या पोलीस  कर्मचारी निवासस्थानापासून वंचित...
सन 1938 मध्ये तयार झालं शेगाव पोलीस स्टेशन...

बांधकामासाठी प्रस्ताव मंजूर असून सुद्धा इमारत नाही..

वरोरा.... जगदीश पेंदाम

वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या वरोरा तालुक्यातील गाव शेगाव बु.  या गावची लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे या गावात एक इंग्रज काळापासून तयार असलेले पोलीस स्टेशन असून येथील पोलीस कर्मचाऱ्यांना आजही स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर ही निवासस्थानापासून वंचित राहावे लागत आहे...

पोलीस विभाग हा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचा विभाग आहे यामध्ये एखादी घटना घडल्यास शोध करणे,तसेच गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात दक्षता ठेवणे, गावात शांतता टिकवून ठेवणे, एखाद्या ठिकाणी मंत्राच्या दौरा असल्यास त्या ठिकाणी बंदोबस्त करणे निवडणुकांच्या काळामध्ये, बंदोबस्त ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलनामध्ये, बंदोबस्त करणे पोळा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, होळी, जत्रा आदी ठिकाणी प्रतिबंधात्मक उपयोग बंदोबस्त करणे, तसेच आमदार, खासदार, मंत्र्यांचे कार्यक्रमांमध्ये बंदोबस्त करणे यामध्ये महत्त्वाची भूमिका पोलीस करत असतात..

शेगाव बु.मध्ये पोलीस स्टेशनची इमारत असून नामशेष मोळकळीस आलेली इमारत आहे यामध्ये कर्मचारी राहण्यायोग्य नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी राहुन आपली कर्तव्य बजावत आहेत, शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 103 गावे येत असून मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेला 53 जावे जोडलेली आहे तसेच या पोलीस स्टेशनला जिल्ह्यातील भद्रावती,वरोरा, चिमूर तालुक्यातील गावे जोडलेले आहे, तसेच वर्धा जिल्ह्याची सीमा जवळच लागून आहे..

शेगाव पोलीस स्टेशन मध्ये 42 पोलिस स्टाँप असुन यामध्ये एपीआय 1 पीएसआय 2 पदे समाविष्ट केलेली आहे..

नवीन पोलीस स्टेशनच्या बांधकामाच्या प्रस्ताव मंजूर असून यामध्ये डबल मधली इमारतीची मंजुरी आहे, त्यामध्ये सोळा कॉटर दोन ऑफिसर कॉटर एक कंपाऊंड ग्राउंड वॉल  प्रस्ताव शासनाकडे मंजूर आहे.
इंग्रज काळापासून सन 1938 पासून शेगाव पोलीस स्टेशनला 87 वर्षे पूर्ण झालेले असून आतापर्यंत या ठिकाणी 62 पोलीस ठाणेदार यांनी पदभार सांभाळलेला आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!