रुग्णालयात विषारी कोब्रा घुसला, सर्पमित्रांच्या तत्परतेने धोका टळला



उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयू ऑपरेशन रूममध्ये कोब्रा साप आढळला; मोठा अनर्थ टळला


आज दुपारी सुमारे एक वाजता उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयू ऑपरेशन रूममध्ये दरवाज्याच्या फटीतून साप जात असल्याचे एका सतर्क कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. तातडीने ही माहिती संजीवन पर्यावरण संस्थेच्या सर्पमित्रांना देण्यात आली.
सर्पमित्र उमेश झिरे यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल होत ऑपरेशन रूमची पाहणी केली. तपासणीदरम्यान अॅल्युमिनियमच्या दरवाज्याच्या फ्रेममध्ये लपलेला साप आढळून आला. सर्पमित्रांनी सुरक्षित पद्धतीने सापाला बाहेर काढले असता तो विषारी कोब्रा साप असल्याचे स्पष्ट झाले.
वेळीच दाखवलेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्रांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा धोका टळला आहे. या धाडसी व जबाबदार कार्यासाठी सर्पमित्र उमेश झिरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
👉 रुग्णालय परिसरात एकच खळबळ, मात्र सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!