नवभारत विद्यालयात "हिंद की चादर" कार्यक्रम संपन्न

गुरु तेग बहादुर यांची साडेतीनशेवी जयंती ‘हिंद की चादर’ कार्यक्रम नवभारत विद्यालय, मूल येथे उत्साहात साजरी


मूल : शीख पंथाचे नववे गुरू आणि धार्मिक स्वातंत्र्याचे महान रक्षक गुरु तेग बहादुर महाराज यांच्या साडेतीनशेवी जयंतीनिमित्त नवभारत विद्यालय, मूल येथे ‘हिंद की चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे त्याग, शौर्य आणि सद्भावनेचा संदेश पोहोचवण्यासाठी विद्यालयाने विविध उपक्रम राबवले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या रॅलीने झाली. ही रॅली मूल येथील गुरूद्वारापर्यंत काढण्यात आली. गुरूद्वारात विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादुर महाराजांचे पराक्रम, धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान, आणि शीख धर्मातील मूलभूत तत्त्वांविषयी सखोल माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. ए.एच. झाडे सर, पर्यवेक्षक सौ. व्ही.एस. भांडारकर मॅडम, कु. उमक मॅडम, काटकर सर, पुस्तकडे सर, कामठी सर, खोब्रागडे मॅडम, कामडी मॅडम, आणि नवभारत विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी गुरु तेग बहादुर महाराजांनी दिलेल्या सहिष्णुता, मानवता आणि धर्मनिरपेक्षतेच्या संदेशाचे पालन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!