मूल तालुक्यातील चिचाळा गावात अस्वलिची गावप्रदक्षिणा



मूल 
मूल तालुक्यातील मौजा चिचाळा येथे मंगळवारी रात्री तीन अस्वलींनी गावात शिरुन नागरिकांमध्ये घबराट निर्माण केली.

ग्रामस्थांनी गावात शिरलेल्या अस्वलींना जंगलाकडे पळवून लावण्यासाठी फटाके फोडून आणि जोरजोरात ओरडत त्या अस्वलींना सळो की पळो करून सोडले, परंतू त्या अस्वलीचा गावातील हैदोस आणि गावप्रदक्षीणा यामुळे नागरिकांना चांगलेच घाबरवून सोडले होते.

मूल तालुक्यात एकीकडे वाघाच्या हल्ल्याची वाढती प्रकरणे तर दुसरीकडे अस्वलीचा वाढता धुमाकूळ यांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाद्वारे नेमकी काय कारवाई केली जात आहे हा प्रश्न विचारला जात असून वनविभागाद्वारे या वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांची सुरक्षीत या वेशीवर टांगल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

वनविभागाने ही जंगली श्वापदे जंगलात सुरक्षीत राहावित यासाठी प्रयत्न करणे व नागरिक सुरक्षीत राज्यातील अशी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मत याप्रसंगी बोलताना नागरिकांनी व्यक्त केले. चिचाळा गावात अस्वलिची गावप्रदक्षिणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!