भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री यांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश भाजप आमदार बंटी भांगडिया यांना धक्का

चिमूर मतदारसंघातील भाजप नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - भारतीय जनता पार्टी पक्षाचे तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय असलेले जुनेद खान, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री व त्यांचे समर्थक संतोष गोहणे, माजी व्यापारी मंडळ अध्यक्ष चिमूर,सतीश वनकर भाजप नेते चिमूर तसेच जुनेद खान यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची सोडचिट्टी करीत काँग्रेस पक्षात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ, सतीश वाजूरकर यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला.यामुळे चिमूर नगर परिषद निवडणूकित भाजपशी बंडखोरी करून काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्या या नेत्यांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्याची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा चिमूर शहरात जोमाने सुरु असून निष्ठावंत पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये यामुळे रोष आहे. ठिक - ठिकाणी चर्चा आणि पक्षांप्रती संभ्रम निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!