प्रांजल संजय चिंतावार — प्रभाग क्र. ८ मधून भाजपाच्या उमेदवारीसाठी दावेदारी

प्रांजल संजय चिंतावार — प्रभाग क्र. ८ मधून भाजपाच्या उमेदवारीसाठी दावेदारी 


मूल, 
मूल नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून सामाजिक कार्यकर्त्या प्रांजल संजय चिंतावार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी होत आहे.

प्रांजल चिंतावार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. महिलांच्या हक्कांसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि स्वच्छता मोहिमेसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाकाळात गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.
 प्रभाग क्र. ८ च्या सर्वसामान्य जनतेच्या समस्यांशी त्यांनी जवळून नातं जोडलं आहे. त्यामुळेच “सेवा हाच धर्म — विकास हाच संकल्प” या घोषवाक्यासह त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांना चांगले प्रतिसाद मिळत असून, प्रभाग आठमध्ये त्यांच्या नावाभोवती सकारात्मक चर्चा सुरू आहे.
जर त्यांना उमेदवारी मिळाली, तर तरुण वर्ग आणि महिला मतदार यांच्या मोठ्या पाठिंब्याने भाजपाचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!