संगम हायस्कूल, चिखलगावचा स्तुत्य उपक्रम — ग्रामस्थांच्या सहकार्याने नदी-नाल्यावर बंधारा बांधून जलसंधारण

संगम हायस्कूल, चिखलगावचा स्तुत्य उपक्रम — ग्रामस्थांच्या सहकार्याने नदी-नाल्यावर बंधारा बांधून जलसंधारण

 तळोधी बा.  . : 
                     नागभीड  तालुक्यातील संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव यांनी ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातून जलसंधारणासाठी  सामाजिक  उपक्रम राबवून दाखवला आहे. गावालगत असलेल्या नदी-नाल्यावर तात्पुरता बंधारा बांधून पाणी साठवण्याचे काम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे पूर्ण केले.

या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढणे, शेतीस पुरेसा निचरा मिळणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होणे यासाठी मोठी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रत्यक्ष धडे मिळावेत, सामूहिक जबाबदारीची जाणीव व्हावी आणि शाळा-गाव एकत्र येऊन शाश्वत विकास साधावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे मुख्याध्यापक श्री. बि. डबल्यु. खोब्रागडे यांनी सांगितले.

ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहकार्य करत साधनसामग्री, कामगार हात आणि मार्गदर्शन दिले. “शाळेच्या पुढाकारामुळे गावात पाण्याच्या समस्येवर खऱ्या अर्थाने उपाय मिळू शकतो,” असे एका ग्रामस्थांनी सांगितले.

संगम हायस्कूलने हाती घेतलेला हा उपक्रम केवळ जलसंधारणापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कर्तव्यभावना, पर्यावरणप्रेम आणि सामुदायिक एकजूट रुजवणारा ठरला आहे. परिसरातील इतर शाळांसाठी व गावांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. यावेळी चिखलगावचे सरपंचा सौ सिंधुताई उईके, ग्रामसेविका लाडे मॅडम, पोलीस पाटिल प्रफुल खोब्रागडे आणि आंगणवाडी सेविका  लता मसराम , नलिनी आत्राम  व शाळेतील शिक्षक बि. एम. गायकवाड, एस. बि. कामंडी, पि. डी. बोरेवार, पि पि. दडमल, राहुल सोनवाने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!