काँग्रेसला मोठा धक्का! प्रमुख पदाधिकारी संदीप मोहबे भाजपा प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का!
प्रमुख पदाधिकारी संदीप मोहबे भाजपा प्रवेश


काँग्रेसचे निष्ठावंत आणि प्रभाग १० चे इच्छुक उमेदवार संदीप मोहबे यांनी आज माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसने उमेदवारीचे आश्वासन देऊनही ऐनवेळी बाहेरून उमेदवार आयात करून मोहबे यांना धोका दिल्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

संदीप मोहबे है काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

मोहबे यांच्या भाजप प्रवेशामुळे प्रभाग १० मध्ये भाजपाचा विजय निश्चित झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे असून, याचा थेट फायदा नगराध्यक्ष निवडणुकीतही होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!