बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदावर तिहेरी लढत! शिवसेनेचा ‘नवा सिक्का’ चमकणार का?
तालुका प्रतिनिधी वसंत मुन
बल्लारपूर : नगर परिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्ष पदाची तिहेरी जोरदार लढत रंगणार हे आता निश्चित झाले आहे.
काँग्रेसकडून सौ. अलका अनिल वाढई, भाजपकडून रेणुका दुधे, तर शिवसेना (उबाठा) कडून चैताली दीपक मुलचंदानी यांनी उमेदवारी दाखल करताच वातावरण तापले आहे.
मात्र या तिन्ही अधिकृत उमेदवारांसोबतच शहरात एक नवीन आणि प्रचंड चर्चेचा मुद्दा वेगाने गती घेत आहे —
“शिवसेना (उबाठा) यंदा नगराध्यक्ष पदावर झेंडा रोवणार का?”
राजकीय जाणकारांच्या मते —
भाजप–काँग्रेस एकमेकांविरोधात टोकाच्या लढतीत अडकलेल्या
तिसऱ्या पर्यायाची मागणी वाढतेय
आणि त्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला मिळताना दिसतोय
शहरातील राजकीय वातावरण सध्या तुफान तापलेले असून
काँग्रेस आणि भाजप दोघांचीही प्रचार मोहीम शेवटच्या टप्प्यात वेग घेत आहे.
मात्र जमिनीवर चालणाऱ्या चर्चांमुळे मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतोय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
३ डिसेंबर
मतदान पेटीतूनच बाहेर येणार आहे अंतिम उत्तर —
बल्लारपूरचा पुढचा ‘ नगराध्यक्ष कोण?
तिहेरी लढतीत कोण उचलेल विजयाची पालखी – काँग्रेस, भाजप की शिवसेना?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!