शेगाव बू पोलिसांची कोंबडबाजार धाड...

शेगाव बू पोलिसांची कोंबडबाजार धाड...

4 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

वरोरा.... जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पारोधी शेत शिवार जंगल परिसरात कोंबड बाजार भरत  असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी धाड टाकून दोन आरोपी सहित सहा टूव्हिलर  जप्त करण्यात आली..

 यामध्ये आरोपी जवळ 2600 रुपये तसेच दोन धारदार काती, 6 टू व्हीलर किंमत चार लाख 30 हजार रुपये, 4 कोंबडे 4000 रुपये , यामध्ये एकूण जप्त केलेला 4 लाख 37 हजार रुपये माल जप्त करण्यात आला. शेगाव पोलिसांनी कलम 12 ब/ म, जू, का कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून ही कार्यवाही शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर केकाण, दिनेश ताटेवार, प्रफुल कांबळे यांनी केलेली आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!