दिवाळीच्या दिवशी अवैध रेती उपसा करताना नदीपात्रात अपघाती मृत्यू...
अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण?
मृतक चिमूर तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी....
वरोरा.... जगदीश पेंदाम
पावसाळा संपताच वरोरा, भद्रावती तालुक्यात ठिकठिकाणी नदी नाल्यातून अवैध रेती तस्करी सुरू असून मोठ्या प्रमाणात रात्र, दिवस खुलेआम अवैध रेती तस्करी करून अवैध गौन संपतीची लूट करीत आहे,यातच काल सायंकाळच्या सुमारास दिवाळीच्या दिवशी एका इसमाचा आष्टा नदीपात्रातू अवैध रेती उपसा करताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे...
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास परिसरातील काही रेती तस्कर अवैध उपसा करण्यासाठी गेले असता चिमूर तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी प्रमोद रामभाऊ शरकुरे वय वर्ष 34 याच्या घटनास्थळावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एकीकडे रेती तस्कर मोठ्या प्रमाणात हे रात्रीच्या सुमारास शेतीकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पावडरचा वापर करून नदीपत्रातून रेतीचा उपसा करून वाटेल त्या चढ्या भावाने गरजुनची लूट करत सहा ते सात हजार रुपये प्रति ट्रॅक्टर रेती विकत असून यावर अंकुश लावणे महसूल प्रशासनाला मात्र काही शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. सूत्रांच्या माहिती नुसार प्रमोद शेरकुरे हा काही दिवसा आदि शेगाव मध्ये असणाऱ्या भाऊजी कडे घरकाम बांधकामासाठी आला असून तो शेगाव मध्येच राहत होता काही अवैध रेती तस्करांनी त्याला रेती घाटावर चोरीच्या मार्गाने रेती तस्करी करण्यासाठी सोबत नेले अशी माहिती मिळाली असून त्याचा तिथेच मृत्यू झाला आहे.
शेगाव पोलीस घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उत्तरणी तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आले असून शेगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे...
खरच घातपात की ? अपघात परिसरात चर्चेला उधान..
त्याचा नेमका मृत्यू हा कशामुळे झाला व हा नेमका घातपात कि आणखी काही हेच शोधणे पोलिसासमोर महत्वाचे असून परिसरात जनतेच्या मनात या घटनेला खरंच घातपात की अपघात अशी चर्चा परीसरात बोलल्या जात आहे....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!