सावली शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृष्णा राऊत यांची नियुक्ती - आमदार वडेट्टीवार यांनी नियुक्तीपत्र देत दिल्या शुभेच्छा

 सावली - काँग्रेस पक्षाचे युवा नेते, पंचायत समिती सावलीचे माजी सभापती कृष्णा राऊत यांची सावली शहर अध्यक्ष पदी नियुक्ती लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधिमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार यांनी नवनियुक्त अध्यक्ष कृष्णा राऊत यांचे नियुक्तिपत्र पुष्पगुच्छ, शाल देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार, माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम, माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे, तालुका अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावली नगराध्यक्ष साधना वाढई,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती राकेश गड्डमवार, माजी प.स.सभापती विजय कोरेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू ठाकरे, माजी उपसभापती दिवाकर भांडेकर,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष अनिल स्वामी, युवक तालुका अध्यक्ष किशोर कारडे, महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!