रास्ता रोको आंदोलनाला नागरिकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदारांनी प्रादेशिक वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांस बंदोबस्त करण्याचा दिला ईशारा

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी ) 

चिमुर : - मागील महिन्यापासून आंबोली लावारी परिसरात वाघाचा धुमाकूळ असल्यामुळे व त्यातच 18 सप्टेंबर रोजी लावारी येथील विद्या मसराम हिचा वाघाने बळी घेतला व त्यानंतर वाघाची परिसरात जनजीवनासोबत होत असलेली चकमक व यामुळे परिसरातील लोकांमध्ये जी भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे
                    वाघाचा बंदोबस्त करा व जंगलाशी लागून असलेल्या गावाला किंवा जंगलाला तारेचा कुंपण करा अशी मागणी धरून आंदोलनाचा इशारा दिला व परीसरातील सर्व वाघाचा आठ दिवसात बंदोबस्त करा असा वनविभागाला अल्टिमेट दिला परंतु वन विभागाने याची दखल न घेतल्यामुळे दिनांक. 14 ऑक्टोंबर ला आंबोली चौरस्ता येथे समस्त नागरिक शेतमजूर शेतकरी यांच्या संगनमताने आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन घेण्यात आला
          यामध्ये शेकडो शेतकरी, मजूर, कष्टकरी, महिला, युवक युवती यांनी आंबोलीचा रस्ता येथील चारही मार्ग जाम करून रस्ताच्या मधोमध आंदोलन सुरू केले.
                जोपर्यंत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी हजर होऊन आमच्या निवेदनातून मागितलेल्या मागण्याला लेखी स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबविणार नाही.
असे ठाम मत आंदोलकांच्या वतीने दिसून आले.
      या आंदोलनात शेतकरी व मजूर म्हणून  शुभम मंडपे,विजय गावंडे,अरविंद राऊत, वैभव ठाकरे, नागपुरे, सरदार,चिचाळा शास्त्री, जावराबोळी, वाकर्ला, गडपिपरी, लावारी, पुयारदंड, वाढोणा, बोरगाव येथील नागरिक, महिला पुरुष उपस्थित होते. 
            त्या आंदोलनाची स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांना माहिती मिळताच आंदोलन स्थळी भेट दिली व आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित असलेल्या जनतेला मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत RFO  देऊरकर  यांना आपल्या वाघाचा 8 दिवसात बंदोबस्त तुम्ही करा,व जंगलाला कुंपण करा अशी समज दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!