शिवाणी आगडेच्या अर्जामुळे भाजपात उमेदवारीचा नवा ट्विस्ट!

शिवाणी आगडेच्या अर्जामुळे भाजपात उमेदवारीचा नवा ट्विस्ट!

मूल नगर परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असतानाच, अखेरच्या क्षणी शिवाणी आगडे यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या गोटात नवीन चर्चांना उधाण आले आहे.

मागील निवडणुकीत केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची जादू चालल्याने नगर परिषदेत भाजपाला यश मिळाले होते. यंदाही त्याच ‘ब्रँड मुनगंटीवार’च्या बळावर अनेक कार्यकर्ते आपली दावेदारी मजबूत करत आहेत. पक्षाने अधिकृतरीत्या इच्छुकांकडून अर्ज मागविले असून, या शर्यतीत आता महिला इच्छुकांची संख्याही लक्षणीय आहे.

भाजपाकडून प्रा. किरण कापगते, माजी नगराध्यक्ष उषा शेंडे, प्रा. चेतना मोहुर्ले, रेखाताई येरणे, प्रा. अर्चना युवराज चावरे, मनिषा प्रशांत लाडवे, अॅड. राजश्री ठाकरे, सौ. माधुरी महेंद्र करकाडे, माजी सभापती विद्या बोभाटे, मनिषा गांडलेवार यांच्यासह सौ. शिवाणी आगडे यांनीही अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर केला आहे.

कोण आहेत शिवाणी आगडे?

अचानक उमेदवारी अर्ज सादर करून चर्चेत आलेल्या शिवाणी आगडे या मूल शहरातील रहिवासी असून, त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या नवभारत कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वर्षा भांडारकर यांच्या कन्या आहेत. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू रणदिवे यांच्या त्या भाची आहेत.

शिवाणी आगडे या खनिज व्यावसायिक संदीप आगडे यांच्या पत्नी असून,  तेली समाजाशी संबंधित असलेल्या या कुटुंबाची समाजात मजबूत पकड आणि आर्थिक क्षमता लक्षात घेता, शिवाणी आगडे यांची दावेदारी दखलपात्र मानली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!