चिमूर तालुक्यातील नेरी शिरपूर रोड वर भीषण अपघात

डुकराच्या धडकेत एकाचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जखमी

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - आज दिनांक. १० ऑक्टोबर ला नेरी शिरपूर मार्गावर वर दुचाकीला जंगली डुकराने जबर धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत भयावह होता कि यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली हि घटना नेरी शिरपूर मार्गावरील हरीचंद्र कामडी यांचे शेताजवळ घडली मृतकाचे नाव युवराज खडसे राहणार पुलगाव असे आहे. तर जखमीचे नाव नरेश कावळे राहणार कोजबी असे आहे.प्रथमोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी याठिकाणी नेले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!