अपुऱ्या बस सुविधे अभावी प्रवाशांचे हालच हाल
शेगाव बु बसस्टॉप जवळ प्रवाशांनी सुमारे अर्धा तास रोखून धरली महामंडळाची लाल परी ( बस )
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व चारगाव खुर्द टप्प्यावरून पश्चिमेकडे असलेल्या ग्रामीण भागातील वडधा, उमरी, साखरा, येरखडा या भागातील विद्यार्थी, महिला, पुरुष, विरुद्ध नागरिक प्रवाशांना गावाकडे परत जाण्यासाठी एकच एस. टी. महामंडळची बस असल्याकारणाने नेहमीच येरखडा जाणाऱ्या बस मध्ये शैक्षणिक विद्यार्थी, प्रवासी मावत नसल्याकारणाने वारंवार प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रवाशांनी जवळपास शेगाव बस स्टॉप वर बस रोखून धरलेली होती.शेगाव हे तालुक्यातील मोठे गाव असून या ठिकाणी परिसरातील 50 ते 60 गावातील विद्यार्थी शिक्षणाकरीता तसेच शेतमजूर, शेतकरी, महिला, वयोवृद्ध नागरिक दररोज येथे कामानिमित्त येत असतात यातच वळधा, उमरी, साखरा, येरखळा या गावाकडे जाण्यासाठी एकमेव बस असल्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत वाद उत्पन्न होतात.अनेकदा हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा पोहचतो व पोलिसांना या मध्ये मध्यस्ती करून वाद सोडवावा लागतो. त्यातच गुरुवारी दुपारी तीन वाजता दरम्यान येणारी येरखेडा बस ही उशिरा आल्याने व सोबतच त्या बसमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने प्रवाशांची कुठल्या बस साधनांनी जायचे असा प्रश्न निर्माण झाला असता शेगाव बस स्टॉप वरून मोठ्या प्रमाणात नागरिक असल्याकारणाने बस मध्ये सर्व प्रवाशांना जागा होऊ शकली नाही अगदी एखाद्या कोंडवाड्यात जनावरे कोंबावीत अशा पद्धतीने प्रवासी कोंबून सुद्धा काही प्रवासी बसच्या खालीच शिल्लक राहिले. त्यामुळे काही प्रवाशांचा राग अनावर झाला व त्या प्रवाशांनी आम्हाला पण बस मध्ये घ्या अन्यथा बस थांबवा तसेच आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्या अशी भूमिका घेतल्या कारणाने वरोरा, शेगाव, येरखेडा जाणारी बस ही अर्धा तास शेगाव बस स्थानकावरच रोखून धरण्यात आली होती. याविषयी प्रवाशांची विचारणा केली असता या आधी याच मार्गांवर शेगाव हिंगणघाट ही बस नियमित यायची परंतु मागील तीन ते चार महिन्यापासून हिंगणघाट,शेगाव, ही बस येत नसल्याकारणाने या मार्गावर एकमेव येरखेडा ही एकमेव बस दुपारच्या सुमारास प्रवाशांना जाण्यासाठी आहे, या बस मध्ये दुपारच्या सुमारास जाणाऱ्या प्रवाशांना एकमेव बसमुळे वारंवार बस स्टॉप वर दुसऱ्या बसची वाट पहावी लागत असुन सायंकाळी सहा वाजता येणारी वडगाव ही बस फक्त फक्त विद्यार्थ्यांनाच नेते त्या कारणाने अन्य प्रवाशांना हलटिंग बस शिवाय पर्याय उरत नाही व हलटिंग बस ही रात्री नऊ ते दहा वाजता येत असल्याकारणाने दिवसभर प्रवाशांना शेगाव या ठिकाणी ताटकळत बसावे लागते असे प्रवाशांनी माध्यमांची बोलताना सांगितले त्यामुळे वरोरा शेगाव वरून वडधा- येरखेडा या मार्गावर अधिकच्या बस सोडाव्या अशी मागणी प्रवाशांनी यावेळी केली आहे, तसेच बंद झालेली हिंगणघाट बस ही नियमितपणे सुरळीत सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. या दरम्यान प्रवाशांनी बस रोखून धरल्या कारनाणी व आतमध्ये विद्यार्थी व अन्य प्रवाशी हे तातकळत असल्याकारणांनी शेवटी शेगाव पोलीस यांना मध्यस्ती करून बस समोरच्या प्रवासाकरीता मार्गस्थ करावी लागली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!