जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अतिक्रमण काढण्यासाठी तातडीने पोलीस स्वरक्षण देण्याची दिली ग्वाही

ग्रामपंचायत महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी यांचे उपोषण मागे

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - ९ ऑक्टोबर २०२५ पंचायत समिती चिमूर अंतर्गत महादवाडी ग्रामपंचायत येत असून हि ग्रामपंचायत विविध विकासकामात अग्रेसर आहे. गावाच्या विकासासाठी सरपंच भोजराज कामडी हे सतत प्रयन्तशील असल्याचे दिसून येते.मात्र विकासकामात अडथळा निर्माण करण्याचे काम कधी वैयक्तिक कारणाने तर कधी वैयक्तिक कारणांचा बाहू करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून विकासकामांची अडवणूक केली जात असल्याचे भोजराज कामडी यांचे मत आहे.

गावातील २० ते २२ अतिक्रमणे काढीत असतांना कोणत्याही नागरिकांनी त्रास दिला नाही.मात्र एका ठिकाणचे अतिक्रमण काढत असतांना वाद होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत न.भु.क्र २६४ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते भु.क्र.  ३२२ यांची जागा उप अधिक्षक भूमि अभिलेख, चिमुर यांचे कार्यालयाकडून रितसर दिनांक. ०७/०८/२०२५ रोजी मोजणी करण्यात आली.

महादवाडी गावठाण गावचा नकाशा बसवितांना गावठाण नकाशाचा काही भाग सर्व्हे नं. १६४ (अतिक्रमण धारक सिद्धार्थ रामटेके) यांचे  कोप-याच्या भागातील असुन त्यांस न.भु.क्र. २६४ असा नमुद करण्यात आलेला असुन धारक सदरी महाराष्ट्र शासन असे धारकांचे नांव नमूद करण्यात आलेले आहे.

मौजा - महादवाडी, न. भु. क्र. २६४, धारक महाराष्ट्र शासन असल्याने मा. सरपंच महादवाडी यांनी तहसिलदार, चिमुर यांचे पत्रानिशी भूमी अभिलेख कार्यालयाकडे न.भु.क्र. २६४ ची हदद कायम करणेकामी ग्रामपंचायत महादवाडी तर्फे नियमीत स्वरुपात अर्ज क्रमांक कॅन (नागपूर) नियमीत १६८७०० नूसार अर्ज सादर केल्याप्रमाणे त्यांस आज्ञावलीप्रमाणे मो.र.क्र. ०७७०२६ हा आज्ञावलीमध्ये देण्यात येवून दिनांक ०७/०८/२०२५ रोजी रितसर अर्जदार व लगत धारक यांना आगाऊ तारखेत मोजणीचे नोटीस कार्यालयीन आवक जावक मार्फत तामील करुन मौजा महादवाडी, न.भु.क्र. २६४ ची मोजणी दिनांक ०७/०८/२०२५ करण्यात येवून मौक्यावर हजर इसमा समक्ष मोजणी होताच न.भु.क्र. २६४ च्या मोजणी दिवशीच हददीच्या खुणा दाखवून प्रचलित नगर भूमापन नकाशाप्रमाणे हदद कायम करण्यात आली.

सिद्धार्थ रामटेके यांचे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही सरकारी जागेवर अतिक्रमण आले असल्याचे मोजणी दरम्यान निष्पन झाले असता सदर अतिक्रमण काढण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी  चिमूर पोलीस स्टेशनला पोलिस स्वरक्षण मिळावे याकरिता १३ महिन्यांपासून सरपंच भोजराज कामडी संघर्ष करीत आहेत. मात्र चिमूर पोलीस विभाग त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे  निदर्शनास येते.अतिक्रमण हटविण्याबाबत पोलीस अधीक्षक ,उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी,उप अभियंता बांधकाम विभाग  यांनी पत्र देऊन सुद्धा चिमूर पोलीस निरीक्षक पोलीस स्वरक्षण देण्यास १३ महिण्यांचा वेळकाढूपणा केल्यामुळे सरपंच भोजराज कामडी यांनी मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालया समोर उपोषणाचे अस्त्र उगारले.मात्र आज उपोषणाला बसण्याअगोदरच मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी १६ ऑक्टोबर नंतर तातडीने अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस स्वरक्षण देण्याची ग्वाही दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.सरपंच भोजराज कामडी यांनी मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विनंती मान्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!