सुप्रसिद्ध लेखक राजेश बाळकृष्ण डोमळे यांच्या "इसेन्स ऑफ ग्रामगीता" या इंग्रजी पुस्तकाचे गुरुकुंज मोझरी येथे थाटामाटात प्रकाशन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - आसगावचे सुपुत्र राजेश बाळकृष्ण डोमळे यांच्या "इसेन्स ऑफ ग्रामगीता" या इंग्रजी पुस्तकाचे गुरुकुंज मोझरी ,जिल्हा-अमरावती येथे हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरी येथे हा भव्य प्रकाशन सोहळा आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.  सप्त खंजिरी प्रबोधनकार इंजि. भाऊसाहेब थुटे, अध्यात्म गुरुकुल मोझरीचे संचालक रवी दादा मानव ,डॉ. रत्नाकर भालकर, नरेंद्रभाऊ जीवतोड आणि भू-वैकुंठ आत्मअनुसंधान केंद्र अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य तुकारामदादा यांचे अनुयायी, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख, भू-वैकुंठ आत्मअनुसंधान केंद्र अड्याळ टेकडीचे संचालक  आदरणीय सुबोधदादा यांच्या मूळ "ग्रामगीता सार" या मराठी पुस्तकाचे राजेश बाळकृष्ण डोमळे यांनी इंग्रजीत "इसेन्स  ऑफ ग्रामगीता" या शीर्षकाखाली भाषांतर केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण जगभरातील लोकांना कळावी आणि त्यांचे विचार जगातील कानाकोपऱ्यात पोहचावे, या उदात्त हेतूने राजेश डोमळे यांनी हे इंग्रजी भाषांतर केले आहे . 
राजेश बाळकृष्ण डोमळे हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास या गावातील रहिवाशी असून सध्या ते विश्व हिंदू परिषद संचालित गुरुकुल आश्रमशाळा उदासा येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत .
राजेश बाळकृष्ण डोमळे हे देशातील सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक असून " लाईफ डझ नॉट एन्ड हिअर, भन्नाट, इंडिया निड्स कलाम नॉट कसाब, मॅन बिहाइंड द शाडोज, सक्सेस इज नॉट द चाईल्डस प्ले" या लोकप्रिय इंग्रजी कादंबऱ्यांचे ते लेखक आहेत . त्यांनी लिहिलेल्या "इंडिया निड्स कलाम नॉट कसाब" या इंग्रजी कादंबरीसाठी जून 2022 मध्ये "आशियातील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार" प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ,हे विशेष ! 
 "इसेन्स ऑफ ग्रामगीता" या पुस्तकाच्या  रूपात राष्ट्रसंतांच्या विचारांचे आणि शिकवणुकीचे इंग्रजीत केलेले भाषांतर म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा ,गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण अशी भावना ते व्यक्त करतात . आपल्या या दैवी कार्याचे श्रेय ते त्यांचे भाऊजी आदरणीय रमेश भजे सर, शाळेचे सचिव आदरणीय रविकिरण चर्जन सर,विजयरावजी शेंडे काका, आदरणीय अनिलभाऊ मेंढे, प्रिय मोठे बंधू  डॉ. अनिलभाऊ  धकाते, मुख्याध्यापक विनायकजी पंडे सर, विलासजी वासनकर सर,प्रिय मित्र विजय पाटील, सौ.वर्षा विजय पाटील,सौ.वर्षा राजेश  डोमळे, एडवोकेट अमितभाऊ रेवतकर,महेश जटाल,विशाल बोरकर, हितेश कुर्वे,अमित तिघरे,संजय आचार्य,अमित बोरकर आणि संपूर्ण मित्रपरिवाराला देतात .
हजारो गुरुदेव भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात मोझरी येथे पार पडला. राजेश डोमळे यांच्या  "इसेन्स ऑफ ग्रामगीता" या इंग्रजी भाषांतराच्या रूपाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आणि तत्वज्ञान इंग्रजी वाचकांपर्यंत पोहचण्यास मोलाची मदत होईल .यांच्या या उदात्त कार्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!