पट्टेदार वाघाने गोऱ्याची केली शिकार
जांभुळघाट येथील घटना
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील गजानन गजभे यांचा गोऱ्याला वाघाने केली शिकार,आज दिनांक.30/10/2025 रोजी दुपारच्या सुमारास गुराखी जांभुळघाट लगत खापरी रोड च्या बाजुला गुरे राखीत असताना अचानक वाघाने हमला करून गोऱ्याला ठार मारले.या घटने ची माहीती मिळताच पाहायला पाहायला बघ्यांची गर्दी जमली होती.चिमूर तालूक्यामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. गाव तिथे वाघ निर्माण झाले असुन त्यांचा बंदोबस्त झाला नाही तर नागरीकांचे घराबाहेर निघने कठिन झाल्या शिवाय राहणार नाही. जांभुळघाट परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले असुन तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे अश्या प्रकारची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!