तुमचा प्रस्ताव तुम्हीच शोधा - मुल एसडिओ कार्यालयात अजब कारभार @ जन्म - मृत्यूच्या प्रस्तावासह अनेक प्रकरणे कार्यालयातून गायब

 

(एसडिओ कार्यालयात आपले प्रकरण शोधतांना अर्जदार)

सावली - जन्म मृत्यू ची नोंद करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर वर्षभरापासून कार्यवाही होत नसल्याने शेकडो प्रस्ताव आदेशाविना मुल उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत. तर आपले प्रकरणे कुठे आहेत हे अर्जदारानाच शोधावे लागत असल्याचे चित्र कार्यालयात दिसते. अनेक प्रकरणे कार्यालयातून गहाळ झाल्याचे दिसत असून आणखी नव्याने प्रस्ताव करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा अर्जदारांना मारावे लागत आहे.

      प्रत्येक शासकीय कामासाठी जन्म- मृत्यू दाखल्याची गरज असते परंतु एकादेवेळी नोंदणी करायचे विसरले असल्यास भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाने यात सुधारणा करून ११ ऑगष्ट२०२३ चे राजपत्रात जन्म- मृत्यू नोंदणी करण्यास एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाल्यास नोंदणी करण्याचे आदेश देण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना दिला आहे. उपविभागीय दंडाधिकारी हे सहानिशा करून संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांना जन्म - मृत्यू नोंदणी करण्याचे आदेश देतील. मागील वर्षभरापासून जन्म - मृत्युचे शेकडो प्रस्ताव मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले असतांना अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. उपविभागीय कार्यालयात या प्रस्तावांचा ढीग साचलेला असून अर्जदारानाच त्यांची प्रकरणे शोधावी लागत आहेत. शोध घेतांना कागदपत्र इकडे तिकडे फेकल्या जात असल्याचे चित्र असून कुणीच वाली नसल्याचा प्रत्यय येतो . अनेक प्रस्ताव गायब झाल्याचे दिसत असल्याने पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करतांना अर्जदारांची दमछाक होत आहे. याकडे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांचे लक्षच नसल्याचे दिसते.

🌼🌼🌼

आजोबाच्या मृत्यूची नोंद नसल्यामुळे मी एक सप्टेंबर २०२४ मध्ये अर्ज दाखल केला आहे परंतु तारखाच देत असून अजूनही काम झालेले नाही. दर दोन दिवसाला प्रवासाचा खर्च करून, दिवसभर बिनकामाने परतावे लागते. अधिकारी काम करण्याचा पगार हे घेत नाही का? कामच करत नसतील तर पगार कशाचा घेतात.

दुशीला अशोक गेडाम 

रा. मारोडा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!