ग्रामसेवकाने केला साहित्य खरेदीत लाखोचा भ्रष्टाचार
भरलेली ग्रामसभेतून सचिवांचे पलायन
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव पासून जवळ असलेल्या भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा तु.गट ग्रामपंचायत मार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी वेगवेगळ्या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली यावेळी सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांनी सचिवाला आलेल्या विविध निधी, ग्रामपंचायत कॅशबुक जमा खर्च माहिती ,आतापर्यंत घेतलेल्या साहित्याची विचारपूस केली असता ग्रामसेवक यांनी सभेतून वाट काढत पलायन केले आहे.
यावेळी विद्या दिलीप सावसाकडे सरपंच, रमाकांत हरिदास सावसाकडे उपसरपंच, रेखा दशरथ पोहिनकर ग्रामसभेत 232 लोकांनी ग्रामसभेत दिलेल्या माहितीनुसार सोलर लाईट साहित्य, 9,44,300 रु. खर्च, स्टील खुर्ची 96700 रु. खर्च, हँडवॉश खरेदी खर्च रू.1,35000 अंगणवाडी फर्निचर खर्च, 2 88 850 रु. कचराकुंडी खर्च 2,15000 रु. प्रसाधनगृह 2,20,000 रु. मोटरपंप खर्च 1078000 रु. आदी साहित्य मध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप आज ग्रामसभेत सरपंच,उपसरपंच,सदस्य, गावकऱ्यांनी केलेल्या आहे.
यावेळी सभेला गावातील महिला, पुरुष ,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर तपासणी होऊन संबंधित सचिवावर कारवाई करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केलेली आहे.या संदर्भात फोन द्वारे ग्रामसेवक यांना विचारपूस केली असता माझ्यावर केलेले आरोप खोटे असून कोकेवाडा तु. येथे आज विशेष ग्रामसभा असल्यामुळे तसेच मला पं स.भद्रावती या ठिकाणी अतिवृष्टी संदर्भात मिटींगला जायचे असल्यामुळे मी तिथून दुपारी निघून आलो, पुढील असलेल्या ग्रामसभेमध्ये या संदर्भात सरपंच,उपसरपंच, गावातील नागरिक यांना माहिती देण्यात येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!