विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश
केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - आनंद अंध विद्यालय आनंदवन च्या वतीने सकाळी साडेसहा वाजता 'एक दिन एक घंटा एक साथ 'या उपक्रमांतर्गत तसेच शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महापुरुषांच्या जयंती निमित्ताने आनंद अंध विद्यालयाच्या विविध परिसरातील ठिकाणी श्रमदान करण्यात आले.या उपक्रमाला
अंध विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला .गांधीजींचा विचार आत्मसात करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे ' तुम्हाला जो जगात बदल झालेला पाहायचा आहे, त्याची सुरुवात स्वतःपासून करा'. या ब्रीद वाक्याचा विचार अंध विद्यार्थ्यांनी स्वतः अंगीकारला .
'हात लगे निर्माण में !नही मांगने नही मारणे' व 'श्रम ही है श्रीराम हमारा'. असा नवयुवकांना मोलाचा संदेश देणारे श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी श्रम विद्यापीठाची संकल्पना मांडून नवतरुणांच्या मनामध्ये रुजवली होती. आनंदवन हे आदर्श गाव असून यामध्ये कृष्ठरुग्ण, दिव्यांग, विधवा व अनाथ बालवृध्द मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. भंगलेल्या हातांनी साधा झाडू हातात धरता येत नसतानाही ते कुष्ठरुग्ण गावकरी मंडळी आपापल्या घराजवळचा परिसर नित्यनियमाप्रमाणे स्वच्छ ठेवतात .या स्वच्छता अभियानात आम्हा अंध विद्यार्थ्यांना दिसत नसले म्हणून काय झाले ,आमच्यातही सामर्थ्य आहे .आमचे आम्ही स्वतः स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर आहोत. असा संदेश देत त्या अंध विद्यार्थ्यांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. महारोगी सेवा समितीचे सचिव ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास भाऊ आमटे व डॉ. भारती आमटे यांच्या आशीर्वादाने तसेच संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे , पल्लवीताई आमटे ,संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू गुरुजी यांच्या पुढाकाराने त्याचप्रमाणे आनंदवन ग्रामपंचायतच्या ग्राम विस्तार अधिकारी विद्या गिलबिले यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा पंधरवडा सप्ताह सुरू असल्याने एक आदर्श गाव म्हणून आनंदवन हे प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहे ,या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर ,आचार्य परमानंद तिराणीक कलाशिक्षक ,साधना माटे जेष्ठ कलाशिक्षिका वर्षा उईके.,विलास कावनपुरे ,तनुजा सव्वाशेरे ,शुभांगी गेडाम, शुभांगी डफ,तृप्ती लोहकरे, शुभम कातकर व जितेंद्र चुदरी,इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह आनंद अंध विद्यालयातील अंतर्गत येणाऱ्या परिसरातील मैदानावरील सकाळी स्वच्छता करण्यात आली या मोहिमेसाठी सर्वांचे योगदान लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!