महामहिम राष्ट्रपती यांना चिमूर तालुका अधिवक्ता संघचे वतीने दिले निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. ६ ऑक्टोबर ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर याठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांना चिमूर तालुका अधिवक्ता संघचे वतीने निवेदन देण्यात आले.
ऍडव्होकेट किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालय चे सरन्यायाधिश भुषण गवई दिल्ली यांचे वर जुता फेक केल्या बद्दल चिमूर तालुका अधिवक्ता संघ चे वतीने महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांचे मार्फत दिनांक. १३ ऑक्टोबर ला निषेध निवेदन दिले.
यावेळी चिमूर तालुका अधिवक्ता संघ अध्यक्ष आर.आर सोनडवले, ऍड.जी.जी अगडे सचिव , ऍड. एम. डी काळे,ऍड सातारडे, ऍड. मुन, ऍड थुटे, ऍड.श्रीरामे, ऍड. पाटील, ऍड. वसाके, ऍड. रामटेके, ऍड. गुरपूडे, ऍड. नन्नावरे, ऍड. धनराज वंजारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!