सनातन संस्था न्यासातर्फे प्रथमोपचार शिबीर संपन्न.


             
         सनातन संस्था न्यासातर्फे प्रथमोपचार शिबीर संपन्न.

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत  *सनातन संस्था या न्यासातर्फे शनिवार दिनांक ११ आक्टोबर २०२५ रोजी स्थापत्य अभियंता श्री. गुणवंत चंदनखेडे यांच्या घरी,गोपाल नगर,तुकुम, चंद्रपूर*, येथे प्रथमोपचार शिबीर घेण्यात आले. 
          सनातन संस्था या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. 
             आपत्काळात स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी प्रथमोपचार शिकणे काळाची गरज आहे हा उद्देश ठेऊन या न्यासाने उपक्रम घेतला .
               *सनातन संस्था या न्यासातर्फे सौ.लता समर्थ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि प्रथमोपचाराचे प्रात्याक्षिकही दाखवले* .या उपक्रमासाठी सौ. सुषमा चंदनखेडे यांनी परिश्रम घेतले.
      या उपक्रमाचा लाभ *२०* जणांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!