८ फूट लांबीच्या अजगराला दिले जीवनदान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव बु येथून जवळच असलेल्या बिजोनी- मोरवा रोडलगत लागून असलेल्या छत्रूघनजी पुसनाके यांच्या शेतात अजगर असल्याची माहिती सर्पमित्र राकेश भुतकर यांना मिळताच कसलाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहचून आठ फूट लांबीच्या अजगराला मोठ्या शिताफीने त्या सापाला पकडण्यात यश आले तसेच त्या सापाला मेसा कक्ष क्रमांक १२ येथील घनदाट जंगलात सोडण्यात आले.या वेळी वन विभागाचे कर्मचारी जितेंद्र लोणकर सर्पमित्र राकेश भुतकर वन मजूर अतुल गायकवाड व सहकारी मित्र अजय ढोक, सतीश नन्नावरे,प्रणय वाढई, सचिन निखारे, कुंदन खंगार इत्यादी युवक हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!